Saturday, October 1, 2022

तणनाशक क्रमांक 2 (मेट्रिब्युझिन ७०% डब्ल्यूपी):

व्यापारी नाव – टाटा मेट्री, सेंकॉर,बॅरियर, आयमॅक्स,

हे कॉम्बिनेशन ट्रायझिनोन समूहात येते, निवडक तणनाशक आहे, जे चयापचय क्रिया व प्रकाश संश्लेषण रोखते. ऊस, बटाटा, टोमॅटो, सोयाबीन आणि गहू या पिकांमधील तणांच्या नियंत्रणासाठी हे उत्तम कार्य करते. हे पाने व मुळे यांच्याद्वारे कार्य करते आणि म्हणूनच, उगवणपूर्व आणि उगवणी नंतर दोन्हीसाठी वापरले जाऊ शकते. हे अरुंद आणि रुंद पानांचे तण दोन्ही चांगल्या प्रकारे नियंत्रित करते.

पीक व तणे

सोयाबीन
तणे- गवत,लव्हाळा,घमटाची भाजी,चिमन चारा, इत्यादी

गहू
तणे- चाकवत,रानमेथी, लव्हाळा,गावात, गाजर गवत इत्यादी

ऊस
तणे- लव्हाळा, हराळी, कांडी गवत, पांढरफुली,चांदवेल,गाजरगवत,केना,बोरूर,शिप्राट, इत्यादी

बटाटा
तणे: रान मेथी,गाजर गवत, चाकवत, इत्यादी

याचे प्रभावी प्रमाण हे 0.2 ते 1kg a.i/ha आहे

फायदे
◆हे तणनाशक रुंद व अरुंद पानांच्या तणावर प्रभावी पणे काम करते
◆मुख्य पिकावर याचा कोणताही परिणाम होत नाही
◆याचा विस्तृत स्पेक्ट्रम मुळे कमी डोस ही तण मारण्यास किफायतशीर आहे

शरद आवटी
प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,महाराष्ट्र राज्य

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची