नीरज कदाचित आयुष्यभर एक सॉफ्टवेअर इंजिनियर बनून राहिले असते जर त्यांनी रायपूर मधील वीएनआर या नर्सरीचा दौरा केला नसता जिथे त्यांनी जम्बो साईझचे पेरू पहिले होते.
हरियाणाच्या जिंद जिल्यातील संगतपुरा या गावात जन्म झालेले नीरज शेतकरी कुटुंबातील असून नीरज यांना लहापणापासून शेतीची आवड होती.
कंम्प्युटर इंजिनीरिंगची डिग्री पूर्ण झाल्यावर नीरज यांना गुरुग्राम व फरिदाबाद येथील नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदावर नोकरीं मिळाली.
शेतीची आवड असली तरीही नीरज यांचे कुटुंबीय नीरज यांच्या शेती करण्याच्या विरोधात होते त्यामुळे नीरज यांनी नोकरीतच आपले मन रमवले होते परंतु एखादी गोष्ट माणूस त्याच्या मनाविरुद्ध जास्त दिवस करू शकत नाही आणि नीरज यांच्या बाबतीत हेच झाले अखेर नीरज यांनी २००४ साली आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली.
सुरवातीला नीरज यांनी पारंपरिक डाळी, भाज्या व अलाहाबाद वरून आणलेले सफेदा पेरूची लागवड केली व तेही जैविक पद्धतीने. नीरज यांनी पिकवलेल्या पिकाची गुणवत्ता चांगली होती परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा दर ठरवायचा अधिकार नसतो ते त्यांना कळले. नीरज यांना त्यांचे पेरू १५ रुपये किलो दराने विकायचे होते परंतु तसे झाले नाही त्यामुळे नीरज यांना खूप नुकसान सहन करावे लागले.

आता नीरज यांनी थेट ग्राहकांना माल विकण्यास सुरवात केली त्यामुळे त्यांना चांगला दर मिळू लागला. परंतु फळे ही नाशवंत असतात व नीरज अशा फळाच्या शोधात होते की ज्याची शेल्फ लाईफ जास्त असेल. आणि शेवटी वीएनआर नर्सरीमध्ये वीएनआर -बिही ही पेरूची जात पहिली, ज्याचे वजन अर्धा किलो पेक्षा जास्त असून हा पेरू १५ दिवस खराब होत नाही.
नीरज यांना या जम्बो पेरूने प्रभावित केले व त्यांनी तात्काळ याचे ३ हजार झाडे खरेदी केली.
जिंद मध्ये असलेल्या ७.५ एकरवरती असलेल्या जमिनीपैकी ३ एकरवर त्यांनी पेरूची लागवड केली.
पहिल्या वर्षी नीरज यांना थोड्या अडचणींना सामोरे जावे लागले. एका झाडापासून ८०-१०० किलो पेरू मिळू शकतात तसेच प्रत्येक पेरूचे वजन ८००-१००० किलोग्रॅम पर्यन्त असते.
झाडांना व्यवस्थित फळे लागल्यावर नीरज यांनी या फळांची विक्री ‘डोर नेक्स्ट फार्म’ या वेबसाईटद्वारे केली त्यामुळे त्यांना चांगला नफा झाला.
नीरज यांना प्रति एकरी या जम्बो पेरूपासून १०-१२ लाखाचा फायदा झाला आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील शेतीत प्रगती करावी यासाठी नीरज शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील देतात. जैविक पद्धतीने शेती करून देखील शेतीमधून चांगला नफा मिळवता येऊ शकतो हे नीरज यांनी दाखवून दिले आहे.