Sunday, May 22, 2022

चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरदाचे व्यवस्थापन

*चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरदाचे उपलब्धता कमी असते. जमिनीतील स्फुरद किंवा खताद्वारे दिलेल्या स्फुरदाची उपलब्धता जमिनीचा सामू 6 ते 7. 5 दरम्यान असेल तर जास्त असते. चुनखडी युक्त जमिनीचा सामू 7. 5 पेक्षा जास्त असल्याने पिकांना पुरेसा स्फुरद उपलब्ध होत नाही. स्फुरदाचे रूपांतर फॉस्फेट, मॅग्नेशिअम फॉस्फेट या संयुगामध्ये होते. हि संयुगे अत्यंत कमी विद्राव्य असतात. स्फुरदाची खते दिल्यानंतर चुनखडीयुक्त जमिनीमध्ये एकानंतर एक अशी संयुगे तयार होतात आणि पिकांना स्फुरदाची उपलब्धता कमी होत जाते. यालाच स्फुरदाचे स्थिरीकरण म्हणतात. यामध्ये फॉस्फेट संयुग पोयट्याच्या कानांवर किंवा चुन्याच्या कनांवर बसते आणि त्यांचा डायकॅल्शिअम फॉस्फेट, ऑक्टाकॅल्शिअम फॉस्फेट संयुगाचे रुपाने साका तयार होतो. ज्याप्रमानात जमिनीचा सामू वाढत जातो त्याप्रमाणे संयुगे होण्याची क्रिया वाढत जाते आणि स्फुरद पिकांना उपलब्ध होत नाही. त्यासाठी स्फुरद खतांची मात्रा वाढविणे आणि जमिनीस स्फुरफ विद्राव्य जिवाणूंचा पुरवठा करणे हा पर्याय उरतो. सतत किंवा नेहमी चुनखडी जमिनीत सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट सारख्या खतातून स्फुरद देणे योग्य योग्य नाही, कारण त्यांची विद्रव्य क्षमता हि अत्यंत कमी असते. उलटपक्षी त्याची स्थिरीकरण जास्त होते आणि पिके स्फुरदाच्या कमतरतेमुळे योग्य ते उत्पादन देऊ शकत नाहीत.*त्यासाठी स्फुरदाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरद खत बेड प्लेसमेंट आणि दाणेदार स्वरूपात दिल्याने तसेच सेंद्रिय खतासोभत वापर केल्याने स्फुरदयुक्त खतांची उपयोगिता वाढते. *या पद्धतीमुळे खतांचा जमिनीतील कानांशी कमी संपर्क व संयोग होतो आणि अविद्रव्यात कमी होते. पिकांच्या मुळाशी वाढ जेव्हा झपाट्याने होत असते, अशावेळी स्फुरदाचे योग्य पुरवठा असणे आवश्यक आहे. त्यासाठी खते देण्याची वेळी हि अत्यंत महत्वाची आहे. *संत्रा, मोसंबी सारखी पिके जर चुनखडी युक्त जमिनीत घेतली असतील तर या पिकांना दरवर्षी नियमित पणे स्फुरद खत देणे आवश्यक आहे.

डॉ.ओमप्रकाश हिरे 7588015491 (प्रबंधक होय आम्ही शेतकरी)

संबंधित लेख

2 COMMENTS

  1. अशा जमिनीवर सिताफळ लावगड करावी का, किंवा काय नियोजन करावे सिताफळ लावायचे असल्यास

  2. माझ्या जमीनीत भरपूर प्रमाणात चुनखडी आहे त्यात ऊस लावला आहे तरी मी खताचे कसे यवस्थापन करू ?मला मार्गदर्शन करा । 9226150023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची