Tuesday, September 27, 2022

चक्रीवादळांना नाव कोण व कसे देतात ? वाचा या लेखातून

चक्रीवादळ म्हणजे काय ?

 • एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्यासाठी चारही बाजूंनी वारे वाहू लागतात. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो.
 • प्रत्येक वेळी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळ निर्माण होतेच असे नाही. मात्र वाऱ्यांमध्ये असलेलं बाष्प आणि ते किती वेगाने थंड होतात त्यावर वादळाची निर्मिती अवलंबून असते.
 • भारतीय उपखंडामध्ये पावसाळ्याच्या पुढे मागे अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्याकडे एप्रिल ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत चक्रीवादळं निर्माण होतात.

उष्णकटिबंधीय चक्रीवादळ (tropical Cyclone)

 • तीव्र कमी दाबाचे केंद्र (डोळा) आणि त्याच्याभोवती वेगाने फिरणारी हवा यांच्या संगमातून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे तयार हातात. ही चक्रीवादळे जेव्हा जमिनीवर पोहोचतात तेव्हा प्रचंड वेगाचे वार वाहतात आणि बहुधा खूप पाऊस पडता.
 • यांना उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ (tropical cyclone) असे संबोधण्याचे कारण म्हणजे ही मुख्यत्वे उष्णकटिबंधीय प्रदेशात निर्माण होतात. म्हणजेच ज्या भागात हवा आणि समुद्राचे पाणी देखील उष्ण असते, त्या भागात अशा प्रकारची वादळे तयार होतात.
 • ही वादळे नॉरईस्टर्स वादळापेक्षा वेगळी आहेत. नॉरईस्टर वादळे निर्माण होण्याचे कारण म्हणजे थंड कमी दाबाची परिस्थिती (cold-core low-pressure systems) आणि उष्णकटिबंधीय (ट्रॉपिकल) वादळे निर्माण होण्याचे कारण म्हणजे उष्ण कमी दाबाची परिस्थिती (warm-core low-pressure systems).

वादळांना नाव कोण देतात ?

 • चक्रीवादळांना नावे देण्याची सुरुवात World Meteorological Organization (WMO) आणि National Hurricane Centre (NHC) यांनी 1953 मध्ये केली.
 • जगभरामध्ये वादळांची नावं 13 भागांमधून ठरवली जातात. त्यामध्ये उत्तर अटलांटिक, पूर्वोत्तर पॅसिफिक, मध्य उत्तर पॅसिफिक, पश्चिम उत्तर पॅसिफिक, उत्तर हिंद महासागर, दक्षिण पश्चिम हिंद महासागर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण पॅसिफिक आणि दक्षिण अटलांटिक यांचा समावेश आहे.
 • अशा प्रकार महासागराच्या अवतीभोवती असणा-या देशांनी सुचविलेल्या नावांनुसार एक यादी तयार केली जाते.
 • त्या त्या प्रदेशातील लोकांच्या परिचयाचे शब्द नावे देण्यासाठी वापरली जातात.

वादळांना नाव कसे देतात ?

 • प्रत्येक लहान मोठ्या वादळाला नाव दिले जात नाही. ज्या वादळाचा वेग ताशि ६० किमी किंवा त्या पेक्षा जास्त असतो त्या वादळांनाच नाव दिले जाते.
 • चक्रीवादळांना नावे देताना Q,U,X, Y Z या अक्षरांनी सुरु होणा-या वणींचा वापर केला जात नाही.
 • एखाद्या चक्रीवादळाने जास्त नुकसान झाले तसेल, तर ते नाव पुन्हा कधीही वापरले जात नाही.
 • सुरुवातीला चक्रीवादळांना केवळ महिलांची नावे दिली जात. 1978 ला पुरुषांची नावे देण्यास सुरवात झाली.

वादळांना नाव का देतात ?

 • यामुळे प्रत्येक वादळाला तात्काळ ओळखण्यास मदत होते.
 • वादळाच्या नावानुसार त्याचा सांभाव्य धोक्यापासून सावधान करण्यास मदत होते.
 • प्रसार माध्यमांना त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यास मदत होते.
 • स्वतंत्र नावामुळे एकाच ठिकाणी ठराविक कालावधीत जर दोन किंवा त्यापेक्षा जास्त वादळे निर्माण झाली तर त्यामुळे होणाऱ्या संभाव्य संभ्रम टाळता येतो.
 • त्याच बरोबर या वादळाच्या स्वतंत्र नावामुळे त्याचा स्वतंत्र अभ्यास करण्यास मदत होते.

उष्णकटिबंधीय वादळांची वेगवेगळी नावे :

A) समुद्रावर निर्माण होणारी चक्रीवादळे :

1) Hurricanes : पश्चिम अटलांटिक महासागर, कॅरेबियन समुद्र, नैऋत्य पॅसिफिक महासागर.

2) Cyclones: उत्तर हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात.

3) Typhoons : पश्चिम / वायव्य प्रशांत महासागर, दक्षिण प्रशांत महासागर, दक्षिण चीन समुद्र (जपान, चीन, फिलिपाईन्स )

B) जमिनीवर निर्माण होणारी चक्रीवादळे :

1) Tornadoes : जगातील जवळपास सर्वच खंडांमध्ये (अंटार्क्टिका वगळता) जमीनींवर (प्रामुख्याने वाळवंटी प्रदेशात) निर्माण होणारी वादळे. ही वादळे समुद्रावर निर्माण होणा-या वादळांपेक्षा आकाराने लहान. परंतु काहीवेळा मोठा संहार. अमेरिकेत टॉर्नेडो वादळांनाच Twisters असेही म्हणतात.

2) Willy-Willies : ऑस्ट्रलियामध्ये (वायव्य भागात) निर्माण होणारी धुळीची चक्रीवादळ.


•        Hurricanes, Cyclones आणि Typhoons या सर्व सारख्या संकल्पना आहेत. परंतु त्यांना विविध प्रदेशानुसार

हि नावे देण्यात आली आहेत.
 • उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नावे देणाऱ्या विविध समित्या वेगवेगळ्या प्रदेशात कार्यरत आहेत.

1) ESCAP/WMO Typhoon Committee

2) WMO/ESCAP Panel on Tropical Cyclones

3)RA I Tropical Cyclones Committee

4) RA IV Hurricane Committee

5) RA V Tropical Cyclones Committee

 • त्यापैकी भारतीय उपखंडाभोवतीच्या चक्रीय वादळांना नाव देण्यासाठी “WMO/ESCAP Panel on Tropical Cyclones”  हि समिती काम करते…
 • याशिवाय, या संभाव्य चक्रीवादळांची संपूर्ण माहिती व पूर्वसूचना देण्यासाठी Regional Specialized Meteorological Centres (RSMC) काम करत असतात.
 • भारतीय उपखंडाभोवतीच्या चक्रीय वादळांवरती काम करणारे RSMC दिल्ली येथे आहे .
 • सन 2000 मध्ये WMO/ESCAP Panel on Tropical Cyclones या समितीची 27 वी बैठक ओमानधील मस्कट येथे संपन्न झाली.
 • याच बैठकीत आठ देशांतील (बांग्लादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड) आठ प्रतिनिधींनी आपल्या प्रदेशातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना नावे देण्याबाबत तत्वतः सहमती व्यक्त केली.
 • सप्टेंबर 2004 मध्ये सन 2004 ते सन 2020 या काळासाठी उत्तर हिंदी महासागर क्षेातील टॉपिकल सायक्लोन्सला नावे सुचविणारी 64 नावांची (आठ देशांनी प्रत्येकी आठ नावे) एक यादी निश्चित करण्यात आली.
 • Panel मधील देशांच्या नावांच्या वर्णक्रमानुसार त्यांचा क्रम निश्चित करण्यात आला असून त्यांनी सुचविलेल्या आठ नावांचे आठ स्तंभ करण्यात आलेले आहेत. जसजशी चक्रीवादळे उद्भवतील, तसतशी या देशांनी सुचविलेली नाव क्रमश: दिली जातात.पहिली यादी तयार करण्यात आली होती.

सन 2004 ते सन 2020 या काळासाठी सुचविण्यात आलेली 64 नावांची यादी

 • २०२० साली आलेलया चक्रीवादळाला “Amphan” हे थायलंड या देशाने सुचविलेले या यादीतील शेवटचे नाव देण्यात आले. ही यादी 2020 पर्यंतची होती.
 • यानंतर येणाऱ्या चक्रीवादळांना नाव देण्यासाठी RSMC, दिल्ली यापूर्वीच यादी तयार करण्यात आलेली आहे.
 • आता ही यादी तयार करण्यासाठी एकूण १३ देशांचे योगदान आहे. यामध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, यू. ए.ई. आणि येमेन या आणखी ५ देशांनी सुचविलेली नावे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
List Contributing nation
Bangladesh India Iran Maldives Myanmar Oman Pakistan Qatar Saudi Arabia Sri Lanka Thailand U.A.E. Yemen
1 Nisarga Gati Nivar Burevi Tauktae Yaas Gulab Shaheen Jawad Asani Sitrang Mandous Mocha
2 Biparjoy Tej Hamoon Midhili Michaung Remal Asna Dana Fengal Shakhti Montha Senyar Ditwah
3 Arnab Murasu Akvan Kaani Ngamann Sail Sahab Lulu Ghazeer Gigum Thianyot Afoor Diksam
4 Upakul Aag Sepand Odi Kyarthit Naseem Afshan Mouj Asif Gagana Bulan Nahhaam Sira
5 Barshon Vyom Booran Kenau Sapakyee Muzn Manahil Suhail Sidrah Verambha Phutala Quffal Bakhur
6 Rajani Jhar Anahita Endheri Wetwun Sadeem Shujana Sadaf Hareed Garjana Aiyara Daaman Ghwyzi
7 Nishith Probaho Azar Riyau Mwaihout Dima Parwaz Reem Faid Neeba Saming Deem Hawf
8 Urmi Neer Pooyan Guruva Kywe Manjour Zannata Rayhan Kaseer Ninnada Kraison Gargoor Balhaf
9 Meghala Prabhanjan Arsham Kurangi Pinku Rukam Sarsar Anbar Nakheel Viduli Matcha Khubb Brom
10 Samiron Ghurni Hengame Kuredhi Yinkaung Watad Badban Oud Haboob Ogha Mahingsa Degl Shuqra
11 Pratikul Ambud Savas Horangu Linyone Al-jarz Sarrab Bahar Bareq Salitha Phraewa Athmad Fartak
12 Sarobor Jaladhi Tahamtan Thundi Kyeekan Rabab Gulnar Seef Alreem Rivi Asuri Boom Darsah
13 Mahanisha Vega Toofan Faana Bautphat Raad Waseq Fanar Wabil Rudu Thara Saffar Samhah

तौत्के चक्रीवादळ
 • हे या यादी मधील पाचवे नाव आहे.
 • या चाक्रीवादळाचे नाव ब्राह्मदेशाने म्हणजेच म्यानमारने दिले आहे.
 • दि. १३ मे ते १८ मे, २०२१ पर्यंत हे वादळ कार्यरत राहील व अखेर गुजरात ला धडकेत असा अंदाज IMD ने दिला आहे.  
 • या वादळाचा फटाका श्रीलंका आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसेल.
 • हे चक्रीवादळ तशी १३ किमी वेगाने उत्तरेकडे सरकत आहे.

प्रितम प्र. पाटील, एम.एस्सी. (कृषी हवामानशास्त्र), विद्यार्थीवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (8698030238)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची