Saturday, January 28, 2023

केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या अर्जातील त्रुटी दूर करणार राज्य शासन

मोदी सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ देशातील अनेक शेतकरी घेत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारकडून वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत आहे. पण अशा बरेच शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. राज्यात अनेक शेतकरी आहेत ज्यांना या योजनेचा अजून लाभ मिळालेला नाही. यासाठी कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी विशेष मोहिम राबवण्याचे सांगितले आहे.

ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यासाठी गुरुवार पासून ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम राबवून लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नविन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात ६९४९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी काल आढावा बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी सहसंचालक यावेळी उपस्थित होते.

राज्यात १ कोटी ५२ लाख शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ४ लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्रुटी असलेल्या माहितीमध्ये जिल्हास्तरावर दुरुस्तीसाठी करण्यात यावी यासाठी २३ जुलै ते ५ ऑगस्ट या पंधरवड्यात विशेष मोहिम राबवून माहितीतील त्रुटी दूर करून नविन लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.

या कालावधीत सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी महसुल यंत्रणेशी समन्वय साधून योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रूटी दूर कराव्यात व शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी दिले. कोरोना संकटाच्या काळात १ एप्रिल नंतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २४४१ कोटी रक्कम थेट जमा करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची