Tuesday, January 25, 2022

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवणं झालं सोपं; एसबीआयने आणली नवी सुविधा

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी एक ऑफर आणली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे ते शेतकरी आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकतील, तेही घरी बसून. स्टेट बँकेने आपल्या योनो कृषीवर किसान क्रेडिट कार्डवरील समीक्षा नावाची एक सुविधा सुरु केली आहे. याच्यामार्फत शेतकरी आपल्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू किंवा कमी करु शकतील. यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. एसबीआयकडून सांगण्यात आले आहे की, योनो कृषीवर केसीसीचा समीक्षा पर्याय निवडा. दरम्यान मर्यादा वाढविण्याची प्रक्रिया ही फक्त ४ क्लिकने पुर्ण करु शकता.

काय आहेत केसीसीच्या वैशिष्ट्ये
केसीसी खात्यात क्रेडिट बॅलन्सवर बचत खात्यावरील पैसावर व्याज मिळते. सर्व केसीसीधारकांना मोफत एटीएमसह डेबिट कार्ड दिले जाते.

तीन लाख रुपयांपर्यतचे कर्ज आपल्याला फक्त २ टक्के व्याजदराने मिळते. यासह प्रत्येक वर्षात यात सूट देखील दिली जाते. जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केले तर व्याजातून आपल्याला अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट मिळते.

सर्व केसीसी कर्जासाठी अधिसूचित पीक किंवा अधिसूचित क्षेत्र, पीक विमाच्या अंतर्गत कवर केले जातात. पहिल्या वर्षाच्या कर्जाची रक्कम कृषी खर्च, कापणीनंतरचे खर्च आणि शेतीतील जमीन देखभाल खर्चाच्या आधारे ठरविली जाते.केसीसीच्या 60 लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेसाठी दुय्यम सुरक्षा आवश्यक नाही.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची