Saturday, January 28, 2023

“किंग ऑफ जॅकफ्रुट -रत्नागिरीचे हरिश्चंद्र देसाई”

रत्नागिरी जिल्यात राहणारे हरिश्चंद्र देसाई स्वतःच्या १३ एकर जमिनीवर फणसाची शेती करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात फणसाची शेती करणारे ते एकमेव शेतकरी आहेत आणि लोक त्यांना प्रेमाने किंग ऑफ जॅकफ्रुट देखील बोलतात. कोकण हे आंब्याच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे परंतु हरिश्चंद्र यांनी मात्र फणसाची शेती करून एक नवीन ओळख बनवली आहे. ६० वर्षीय हरिश्चंद्र सांगतात की प्रत्येक वर्षी जुन महिन्यातील वटपौर्णिमेला व्यापारी प्रत्येक फणसामागे ५-१० रुपये देऊन खरेदी करतात. हरिश्चंद्र यांना मात्र हे सर्व बदलायचे आहे. ते सांगतात की शेतकरी प्रत्येक फळापासून १००-२०० रुपये कमावू शकतो.

हरिश्चंद्र यांच्या गावाची लोकसंख्या केवळ ६०० असून जिथे नारळ, काजू, जायफळ, सुपारी व तांदूळ यासारख्या पिकांची लागवड केली जाते परंतु फणस लागवड अतिशय कमी प्रमाणात केली जाते. जिथे फणसाची लागवड केली जाते तिथे हरिश्चंद्र २ प्रकारच्या फणसाची लागवड करतात त्यामध्ये सॉफ्ट रसाळ व फिरमर कापो हे आहे. कच्च्या फणसाची भाजी केली जाते तर पिकलेले फणस विक्री केले जाते. आज फणस पश्चिमी देशात लोकप्रिय होत असून देशातील कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसा, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ, मध्यप्रदेश व काही पूर्वेकडील राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर फणसाची शेती केली जाते.

हरिश्चंद्र यांनी फणसाची शेती करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असून फणसाबरोबर आले, लिंबू व हळदीची देखील ते लागवड करतात. फणस शेतीला बढावा देण्यासाठी हरिश्चंद्र यांनी नर्सरी देखील चालू केली आहे. मागील वर्षी लॉकडाउन दरम्यान ३ हजार रोपे विक्री केले असून १० हजार पेक्षा अधिक रोपे त्यांनी तयार केले आहेत. आज हरिश्चंद्र यांच्याकडे फणसाच्या ७५ जाती असून प्रत्येकाला त्यांनी वेगळवेगळे नाव दिले आहे. १३ एकर वरती १२५० पेक्षा अधिक झाडे असून जे प्रत्येक मोसमात फळे देतात.उर्वरित १० एकर जमिनीवर हरिश्चंद्र काजूची देखील शेती करतात.२०१७ मध्ये केरळ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय फणस महोत्सवात सहभागी होणारे ते एकमात्र शेतकरी होते.

हरिश्चंद्र यांना त्यांचा मुलगा मिथिलेश हा देखील शेतीचा कामात मदत करतो. हरिश्चंद्र यांच्या अनुसार प्रत्येक झाड प्रत्येक वर्षी २०० फळे देते तर जुने झाड असेल तर त्यापासून जवळपास ५०० फळे मिळतात ज्यापासून त्यांना लाखोंची कमाई होते. हरिश्चंद्र यांनी स्वतची फार्मर प्रोड्युसर कंपनी देखील चालू केली आहे ज्याच्याशी ५०० शेतकरी जोडले गेले आहेत.हरिश्चंद्र यांनी तेव्हा शेती सुरु केली होती जेव्हा त्यांच्या भागात कोणीही फणस शेतीबाबत गंभीर नव्हते परंतु अशा परिस्थितमध्ये देखील त्यांनी कष्ट करून यश संपादन केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची