Saturday, May 21, 2022

ऊस लागवड करायची तर मग जाणून घ्या उसाच्या या जातींविषयी

कुठल्याही पिकाचे वाण म्हटले म्हणजे त्यामध्ये काहीतरी गुण आणि अवगुण असतात. असाच काहीसा प्रकार ऊसा मध्ये सुद्धा दिसून येतो. उसाची लागवड करताना शेतकऱ्यांनी शक्यतो एकाच उसाच्या जातीवर अवलंबून न राहता आपल्या भागाला वातावरणाला आणि हंगामाला तसेच आपल्याकडे उपलब्ध पाण्याचा विचार करून प्रचलित असून प्रजातींचा अवलंब करावा. ह्या लेखात आपण अशाच काही ऊस जातींची माहिती घेणार आहोत.

को-86032:

•आडसाली हंगामात शंभर टनांवर जास्त उत्पादन घेण्यासाठी वापरले जाणारे वरायटी आहे.

•चांगली निचऱ्याची जमीन या प्रजातीला मानवते.

•मिळणाऱ्या फुटव्यांची संख्या काही प्रमाणात गरजेपेक्षा जास्त असल्यामुळे वेळच्या वेळी अंतर मशागती आणि विविध उपाय करून फुटवे नियंत्रण ठेवावे लागतील.

•या प्रजातीची एकरी 20 टन पासून ते 100 टनांपर्यंत उत्पादन देऊ शकते

•योग्य वेळी योग्य प्रमाणात खते वापरली तर चांगले उत्पादन देणारी हीजात आहे.

•आणस/ डोळे /पांगश्याफुटत नाहीत परिणामी चांगले उत्पादन घेणारे शेतकरी या उसाचा वाळलेला पाला दोन ते तीन टप्प्यांमध्ये काढतात.

2-COM-265:

•ही जात तीनही हंगामासाठी चालते परंतु कारखान्याच्या कडून आडसाली ची शिफारस करण्यात आली आहे.

•मध्यम ते भारी जमिनीत या जातीच्या उसाचे उत्पादन चांगल्या पद्धतीची मिळते.

•इतर जातींपेक्षा पाण्याची गरज थोडी जास्त असते.

•जास्त पाणी धारण क्षमता असणाऱ्या किंवा चोपण आणि क्षारपड जमिनीत ऊस इतर जातींपेक्षा बरायेतो.

•अत्यंत अनियंत्रित पद्धतीचे भरपूर फुटवे आणि त्यामुळे सुरुवातीच्या तीन चार महिन्यांपासून ते अगदी आठ नऊ महिन्यांपर्यंत होता राहणारी उसाची मर यामुळे 100 टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी याजातिकडे थोडेसे दुर्लक्ष करतात.

•आणस/ डोळे आणि पांगश्या फुटतात.

3 -vsi 8005(12121):

•मध्यम ते हलक्‍या जमिनीत चांगलायेतो.

•अत्यंत नियंत्रित फुटवे. उसाची संख्या एकरी तीस हजार ते पस्तीस हजार पर्यंत मिळते.

•सूक्ष्म अन्नद्रव्यांची अत्यंत कमतरता जाणवते उसाचा संपूर्ण प्लॉट अचानक पूर्ण पिवळा पडतो.

•ज्या शेतकऱ्यांचे उत्पादन प्रतिएकरी अत्यंत कमी आहे अशा शेतकऱ्यांना मध्यम कालावधीत मध्यम उत्पादनापर्यंत नेणारी ऊस जात आहे.

•इतर ऊसाच्या जाती पेक्षा तुलनेत या उसाचा खोडवा आणि निडवा कमी खर्चात कमी मशागतीततुलनेने चांगला येतो.

•पश्चिम महाराष्ट्र वगळता तुरा येण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य असते.

•पाण्याचा ताण सहन करणारी ऊस जात आहे.

4-MS 10001:

•मध्यम ते भारी जमिनीत चांगला येतो. ज्या जमिनीत को एम 265 चालतो तिथे ही जात चांगली येते.

•नियंत्रित निघणारे फुटवे आणि संख्या मर्यादित आणि प्रति ऊस वजन अत्यंत चांगले असल्यामुळे कमी कालावधीत तुलनेने अधिक उत्पादन मिळते.

•गर्द हिरव्या रंगाची रुंद पाने त्यामुळे प्रकाशसंश्‍लेषण योग्य पद्धतीने होते.

•उच्च साखरेचा उतारा अन कालावधी कमी त्यामुळे ऊस लवकर तुटतो.

•पूर्वहंगामी आणि हंगामी यासाठी योग्य ऊस जात आहे.

•या उसाला तुरा मोठ्या प्रमाणात येतो त्यामुळे ज्या भागात उसाला तुरा येण्याची शक्यता आहे तिथे डिसेंबर किंवा  त्यानंतर या उसाची लागवड करू नये अन्यथा या प्रजातीसवाढीसाठी पूर्ण वेळ मिळणार नाही परिणामी उत्पादनात आणि उताऱ्यात घट येण्याची शक्यता असते.

•आपल्या भागानुसार लागवडीचा योग्य हंगाम साधल्यास कमी खर्चात चांगले उत्पादन देण्याची क्षमता या ऊस प्रजाती मध्ये आहे.

( टीप – वरील जातींविषयी काही शंका असल्यास उस क्षेत्रातील तज्ञांशी संपर्क करावा )

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची