Saturday, October 1, 2022

ऊस पिकामध्ये आंतरपिके फायदे व तोटे

तुम्हाला जर ऊसाचे उत्पादन जास्त घ्यायचे असेल तर आंतरपिके घेणे टाळले पाहिजे. आंतरपिके घेतल्याने माझ्या निरीक्षणानुसार आडसाली ऊसाच्या उत्पादनामध्ये एकरी20ते 35टक्के घट येते.ऊस पिकामध्ये आतापर्यंत मी कधीच अंतर पिके घेतलेली नाहीत.

आमच्या भागामध्ये पूर्वी बरेचशे शेतकरी 4.5फूट सरी वरती जुन चा पाऊस सुरू झाल्यानंतर त्याच्या ओलीवरती वरंब्यावर सोयाबीनची एक काकरी सेंटरला टोकन करत असत.त्यामध्ये प्रामुख्याने 335नं व मोन्याटो या वाणाचे सोयाबीन टोकण करत असत.
335 नं या जातीचे काड जास्त वाढते. तुलनेत मोन्याटोची वाढ थोडी कमी असते.व लवकर पक्व होते.
सोयाबीन चे टोकन झाल्यानंतर सरीमध्ये लगेचच आडसाली ऊसाची लावण करत असत.सोयाबीन 110 दिवसाच्या दरम्यान काढणीस यायचा. त्याचे उत्पादन एकरी7क्विंटल पासून 10क्विंटल च्या दरम्यान निघायचे. सोयाबीनचे काड भरपूर वाढल्याने त्याचे वसब ऊसाच्या काकरी वरती पडून ऊस दडपून जायचा.त्यामुळे त्याचा परिणाम ऊसाच्या फुटव्यावरती होऊन सोयाबीन काढतेवेळी ऊसाची फक्त सिंगल काडी शिल्लक असायची. त्याला काहीच फुटवा नसायचा.

सोयाबीनची कापणी झाल्यानंतर फुटवा येण्यासाठी जेठा ऊस(मदर शूट) कापून घेतल्यानंतर फुटवे यायला सुरुवात व्हायची. दरम्यान यामध्ये भरपूर वेळ निघून जायचा. फुटवे लेट निघाल्याने ऊसाचे उत्पादन घटायच.

जे शेतकरी ऊसामध्ये आंतरपीक न घेता लावण करायचे त्यांचा ऊस तेवढ्याच दिवसामध्ये मोठ्या भरणीला यायचा.
आंतरपीक न घेतलेले शेतकऱ्यांचे आडसाली ऊसाचे उत्पादन एकरी 80ते100टनाच्या वरती जायचे.
व जे शेतकरी सोयाबीनचेचे आंतर पीक घेऊन आडसाली ऊस करायचे, त्यांच्या ऊसाचे उत्पादन एकरी 60ते65टणाच्या वरती जात नव्हते. एकरी 20ते 35टनापर्यंत उत्पादनामध्ये घट यायची.
सोयाबीनचे पीक घेऊन एकरी7ते10क्विंटल काढून एकरी 60ते65टन ऊसाचे उत्पादन घ्यायचे का ऊसामध्ये आंतरपीक न घेता एकरी 80ते 100टन उत्पादन घ्यायचे?

अलीकडच्या काळात आमच्या भागामध्ये आडसाली ऊसामध्ये सोयाबीन चे आंतरपीक घेणे जवळ जवळ बंद झालेले आहे.त्याला काही इतर कारणे आहेत. त्या मध्ये प्रामुख्याने खर्चाच्या मानाने मिळणारे सध्याचे रेट,तसेच पूर्वीच्या तुलनेत कमी होत चाललेले उत्पादन,वेगवेगळ्या रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव या सर्व कारणामुळे ऊसामध्ये सोयाबीन चे आंतरपीक घेणं बंद झाले आहे.
आता सुद्धा आडसाली ऊसामध्ये आंतरपिके घेतात.फरक इतकाच की आता ऊसामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन ऐवजी भुईमूग करण्याकडे कल वाढलेला आहे. आडसाली ऊसामध्ये वरंब्यावरती भुईमूग करतात.त्याचे सुद्धा काड भरपूर वाढत असल्याने ऊसाच्या फुटव्यावरती परिणाम होऊन ऊसाचे उत्पादन घटते.

आंतरपिका ऐवजी तुम्ही आडसाली लावण केल्यानंतर हिरवळीच्या खतासाठी 40दिवसांनी सरीच्या एका बगलेला ताग टोकुन तो 40ते45 दिवसांनी कच्या भरणीला किंवा बाळ बांधणीला औत बरोबर मुजवून घेतला तर ते उत्पादनाच्या दृष्टीने अधिक चांगले होईल.40व्या दिवशी ताग टोकून घेतल्याने ऊसाच्या फुटव्यावर परिणाम होत नाही. रोप लावण करणार असाल तर रोप लावण केल्यापासून 30दिवसांनी ताग टोकून घ्या.ताग टोकन करत असताना सहा इंच अंतरावरती 5/6बियाणे टोका. एकरी 12ते15किलो बियाणे लागेल.जे शेतकरी अगदी करेक्ट तंतोतंत टोकन करतात त्यांना एकरी8किलो बियाणे मध्ये टोकन होते.

ऊसामध्ये आंतरपीक घ्यायचे का नाही हा वादाचा विषय होऊ शकतो.माझ्या मते ज्याने त्याने आपल्याला असणाऱ्या गरजे वरती ठरवावे,
कारण काही शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी असतात. ते शेतकरी आंतरपिकातून येणाऱ्या पैशातून ऊसाला खर्च करत असतात.किंवा घरच असावं म्हणून शेंगा करणारे असतात.
तुम्ही एकरीं 100टन टारगेट ठेऊन ऊस करत असाल व त्यामध्ये आंतरपीक घेतले असेल तर तुम्हाला तुमच्या टारगेट पर्यंत पोहचणे अशक्य आहे.
कारण मुख्य पिकामध्ये कुठलेही आंतरपीक घेतले तर उत्पादनामध्ये घट निश्चित आहे..

टीप:-यातील अंतरपिकामधील फोटो माझ्या शेतीमधील नाहीत फेसबुक पोष्ट वरून घेतलेली आहेत.

श्री. सुरेश कबाडे.
✍️प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली
मोबा:- 9403725999

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
80,000SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची