Saturday, August 13, 2022

ऊसाचे पाचट(पाला) काढण्याचे फायदे काय आहेत या बाबत थोडक्यात माहिती पाहू.

 1. उसाचे पाचट काढल्याने संख्या नियंत्रण होते तसेच जाड कोंब ठेवुन लहान मरके कोंब काढले जातात.
 2. बुडातिल पाचट निघाल्याने हवा खेळती राहते त्यामुळे जाडी वाढण्यास मदत होते
 3. नविन वॉटर शूट फुटून येतात. त्यापासून बनणारा ऊस हा जोमदार व वजनदार बनतो
 4. पाचट काढल्यामुळे कांडी कीड,मिलिबग तसेच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
 5. योग्य वयातच आपण बुडातील कोवळा वाळलेला पाला काढतो त्यामुळं तो लगेच कुजून जातो त्यामुळे जमिनीत सेंद्रिय घटक ऍड केले जातात. तसेच उन्हाळ्यात जमिनीवर आच्छादन झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व पाण्याची बचत होते.
 6. पाचट आच्छादन केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
 7. पाचट काढून जमिनीवर आच्छादन केल्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते..

पाचट काढताना शेतकऱ्यांकडून सामान्यता खालील चुका होतात

 1. ज्यावेळी आपल्या उसाचे बुडातील 4 ते 5 टोपणे सुकून जातात त्याच वेळी उसाचे पाचट काढावे.
 2. उसाचे पाचट काढताना फक्त सुकलेली पाने काढावीत. हिरवी पाने अजिबात सोलू नयेत किंवा वैरणीसाठी देखील ऊसाची हिरवी टोपणे अजिबात काढू नयेत.
 3. एका निरोगी वाढणाऱ्या ऊसाला नऊ ते बारा पर्यंत पाने असतात. हिरवी पाने काढून घेतल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर त्याचा परिणाम होऊन उसामध्ये अन्न कमी तयार केले जाते व पर्यायाने उसाची वाढ कमी होते.
 4. एकदा उसाचे पाचट काढल्यानंतर शक्यतो वैरणीसाठी हिरवी टोपणे अजिबात काढू नयेत.

डॉ. अंकुश चोरमुले
आष्टा, सांगली
8275391731

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

सोशल मीडिया

190,772FansLike
12,000FollowersFollow
75,800SubscribersSubscribe

नवीनतम लेख

error: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची