पिकाच्या निकोप आणि उत्तम वाढीसाठी जमीन चांगली तयार करणे नितांत गरजेचे असते. जमिनीचा वरचा थर, ज्यामध्ये खऱ्या अर्थाने पीक वाढते, तो थर हलवून भुसभुशीत करणे, त्यातील तणासारखा भाग काढून टाकणे, मशागत करून वाढीला पोषक वातावरण निर्माण करणे इ. कामे योग्य प्रकारे केली तर ऊस पीक जोमदार येऊन उत्पादनही चांगले येते.
जमिनीची तयारी कशी करावी ?
१. जमिनीची तयारी करत असताना जर आपण मागील एक, दोन ऊसाची पीके घेतलेली असतील तर साधारपणे ६ महिने जमिनीला विसावा ( गॅप ) देणे गरजेचं आहे.
२. या सहा महिन्याच्या कालावधीत एकदा जमिनीची नांगरट, एकदा रोटावेटर मारून मशागत करावी.
३. त्यानंतरच पुढच्या पिकासाठी सरी पाडून ठेवावी.
४. बऱ्याच वेळा काही शेतकरी २ -३ वेळा नांगरट, रोटावेटर मारुन जमिनीची मशागत करतात पण त्यामुळे जमिनीची धूप होते.
५. सेंद्रिय कर्बाचा देखील खूप मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतो.
६. सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते.
सरीतील अंतर –
१. बरेच शेतकरी सरी पाडताना खूप कमी अंतर ठेवतात अगदी ४ फूट किंवा काही वेळा त्यापेक्षा देखील कमी.
२. १०० ते १२५ टनाच्या दृष्टीने सरीतील अंतर हे ५-७ फूट ठेवणे गरजेचे आहे. अशा सरीत पावर टिलरच्या सहाय्याने मशागत करण्यासाठी, रोटावेटर वापरण्यासाठी काही अडचण येत नाही.
३. सऱ्या पाडल्यानंतर जमिनीतील अंतर टेपच्या सहाय्याने मोजावे.
४. जर लागवडीचे अंतर चुकले तर ह्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा ऊसाच्या उत्पादनावर होतो.
बियाणे निवड –
१. बियाणांची निवड करताना शक्यतो को-८६०३२ ह्या जातीची निवड करावी.
२. उत्पादनाच्या दृष्टीने को – ८६०३२ हे बियाणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
व्हीडीवो लिंक 👇
https://youtu.be/5J4NkM0MSSw
डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले,
(एम. एस्सी.(कृषि), पीएच. डी. (कृषी कीटकशास्त्र)
मुख्य कार्यकारी अधिकारी – गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड
संपर्क – ८२७५३९१७३१
ई-मेल – anku.chormule999@gmail.com